E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर : माहिती तंत्रज्ञान उद्योगांना नवी बाजारपेठ
Wrutuja pandharpure
28 Apr 2025
भाग्यश्री पटवर्धन
जागतिक क्षमता केंद्र म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) आणि त्यासाठी लागणार्या मनुष्यबळाच्या निमित्ताने भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगांना नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हे आता नमूद करण्याचे कारण गेल्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांनी याबाबत जाहीर केलेले धोरण.
अनिश्चितता प्रत्येक वेळी संकट असते असे मानण्याचे कारण नाही. कधीकधी ही अनिश्चितता संधी निर्माण करते. काही देशात विशेषतः अमेरिकेने अवलंबलेल्या आक्रमक व्यापार धोरणांमुळे जी वित्तीय आणि आर्थिक फेरजुळणी सुरु आहे तीत जागतिक क्षमता केंद्र म्हणजे कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) आणि त्यासाठी लागणार्या मनुष्यबळाच्या निमित्ताने भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगांना नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हे आता नमूद करण्याचे कारण गेल्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांनी याबाबत जाहीर केलेले धोरण आणि व्यवसाय विस्तार. त्यात इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
या कंपन्यांकडे पाहण्याआधी जीसीसी म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, वित्त सेवा, नविनीकरणीय ऊर्जा, औषध निर्माण अशा विविध क्षेत्रांत जागतिक क्षमता केंद्र सध्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे केंद्र सरकारच्या कामगार विभागाच्या सचिव सुमिता दावरा यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. युरोपसह काही विकसित देशात अशा केंद्रांना लागणार्या कुशल मनुष्यबळाची कमतरता भासते आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फिनलंड, जपान यांचा समावेश आहे. नेमके याबाबत भारतातून हे मनुष्यबळ पुरवले जाते आहे. त्यामुळे दोन फायदे होतात. एक परदेशात जाऊन काम करणारे चांगले मनुष्यबळ देशातच राहते आणि अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे भारतात या क्षेत्रात रोजगार व्यापक प्रमाणात उपलब्ध होतो आहे. दावरा यांच्या माहितीनुसार पश्चिम आशियातील देशात असे मनुष्यबळ गरजेचे आहे. देशातील जीसीसी व्यवसाय २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर होईल असा अंदाज आहे. इतकेच नाही, तर या व्यवसायातून सुमारे २५ लाख रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. सध्या इन्फोसिस, टीसीएस, कॉग्निझंट ही व्यवसाय मिळवण्यात आघाडीवर आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आता विप्रोनेही बॉट म्हणजे बांधा वापरा हस्तांतरित करा हे प्रारूप स्वीकारून काम सुरु केले आहे.
इन्फोसिस या आघाडीच्या कंपनीने नुकतीच याबाबत घोषणा केली. देवल शहा यांच्या नेतृत्वाखाली जीसीसी युनिट विकसित करायचे ठरवले आहे. गेल्या काही महिन्यात आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे भवितव्य अमेरिकेतील मंदीच्या भीतीने धोक्यात आल्याची चर्चा माध्यमात होती. मात्र त्यात फारसे तथ्य नाही. त्याचे कारण भारतात मोठ्या व्यवसाय संधी निर्माण होत आहेत. इन्फोसिसचा कमाल किमान भाव (५२ wk high २००६.४५,५२wk low १,३०७.००) असा आहे तर विप्रोचा (५२ wk high, ३२३.६० ५२ wk low २०८.५०) असा आहे. दोन्ही कंपन्यांच्या तिमाही निकालावर सध्याच्या अस्थिरतेचा फारसा परिणाम झालेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र दोन्ही कंपन्यांना फायद्याचे ठरणार आहे.
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)
Related
Articles
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
मीटर बसविण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करणार
09 May 2025
मान्सून आज अंदमानमध्ये
13 May 2025
शस्त्रसंधीचे उल्लंघन; २० दहशतवादी ठार
14 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
मीटर बसविण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करणार
09 May 2025
मान्सून आज अंदमानमध्ये
13 May 2025
शस्त्रसंधीचे उल्लंघन; २० दहशतवादी ठार
14 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
मीटर बसविण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करणार
09 May 2025
मान्सून आज अंदमानमध्ये
13 May 2025
शस्त्रसंधीचे उल्लंघन; २० दहशतवादी ठार
14 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
पूना नाईट हायस्कूलचा ८९.४७ टक्के निकाल
14 May 2025
मीटर बसविण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करणार
09 May 2025
मान्सून आज अंदमानमध्ये
13 May 2025
शस्त्रसंधीचे उल्लंघन; २० दहशतवादी ठार
14 May 2025
सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेत वाढ
11 May 2025
शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
6
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?